हेअर केअर केस गळणे रोखण्यासाठी करा हे घरगुती आठ उपाय, जाणून घ्या पद्धत

 

हेअर केअर केस गळणे रोखण्यासाठी करा हे घरगुती आठ उपाय, जाणून घ्या पद्धत

 

केस गळणे ही एक खूप साधारण गोष्ट झाली आहे. आज काल जवळजवळ सगळेच केस गळणे या समस्येने त्रासलेले आहेत. आज कालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये खाण्यापिण्याच्या  बदललेल्या सवयी  आणि मॉडर्न जीवनशैली याच्यामुळे लोकांना केस गळणे या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

केस गळणे या प्रक्रियेमध्ये निष्क्रिय आणि मृत केस गळून पडताततसे पहायला गेले तर केस गळणे ही एक गंभीर समस्या आहे ज्याच्यामुळे मानवाच्या सामाजिक आणि मानसिकतेवर परिणाम होतो. केस गळणे हे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये असू शकते जसे की केस पातळ होणे, किंवा टक्कल पडणे.केस गळण्याच्या भीतीमुळे केस विंचरणे ही नकोसे वाटते. घरामध्ये जिकडे तिकडे केस पडतात झोपून उठल्यावर उशीवरती केसबेसिनमध्ये केसबाथरूम मध्ये केस या सर्व  गोष्टींमुळे केस गळणे की एक गंभीर समस्या वाटू लागते. आज कालची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी, प्रदूषण यामुळे बहुतांश लोक केस गळण्याच्या समस्येचे शिकार होत

 

हे सर्व अगदी जीवघेणे नसले तरीही केस गळणे ही अत्यंत तणावपूर्वक आणि मानवाच्या जीवनशैलीवर परिणाम करणारी गोष्ट आहे.म्हणूनच या लेखामध्ये केस गळणे रोखण्यासाठी काही घरेलू उपाय सांगितले आहेतयाचा उपयोग काही प्रमाणात होऊ शकतोपण एक गोष्ट लक्षात ठेवा हे घरगुती उपाय आहेत , आहेत जर तुमची समस्या गंभीर असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 Ayurvedic Beauty tips

1.    नारळाचे तेल ( कोकोनट ऑइल

नारळाचे तेल हे सहजपणे कोठेही उपलब्ध असते. आपल्या सगळ्यांना माहित आहे की नारळाचे तेल अगदी लहान बाळांना मालिश करण्यासाठी वापरतात.

आवश्यकतेनुसार नारळाचे तेल वाटीमध्ये घ्याते कोमट करा आणि केसाच्या मुळाना व्यवस्थित मसाज करातीन ते चार तास तेल तसेच राहू द्यानंतर कोमट पाण्याने धुवा. नियमित मसाज मे परत पडेल.

2.            आवळा 

आवळा हे असे फळ  आहे  की जो भरपूर आरोग्यदायक आहे. नियमित आवळ्याच्या सेवनाने त्वचा आणि केस चांगले होतात हे आपण कित्येक वर्ष ऐकले आहे.

रोज एक आवळा खाल्ल्यास किंवा आवळ्याचा रस ग्रहण केल्यासतुमच्या केसाच्या समस्या दूर होतील

आवळ्याची पावडर तुम्ही कोकोनट ऑइल मध्ये उकळा आणि ती तुमच्या केसाच्या मुळाना अर्धा ते एक तास लावून ठेवावाळल्यानंतर चुकल्यानंतर कोमट पाण्याने धुवा.

किंवा  आवळ्याची पेस्ट करा ती पेस्ट केसाच्या मुळाना लावा आणि एक तासाने कोमट पाण्याने धुवा.

3 जास्वंदीचे फुल

जास्वंदीचे फूल केसांसाठी अतिशय लाभदायक आहे. जास्वंदीचे फूल हे साधारणपणे सर्वत्र आढळते. जास्वंदीचे फूल दोन प्रकारे केसांसाठी तुम्ही वापरू शकता.

पहिली पद्धतजास्वंदीचे फूल घेऊन त्याची पेस्ट तयार करा. ती  पेस्ट  केसाच्या मुळाना लावा आणि एका तासाने कोमट पाण्याने केस धुवा.

दुसरी पद्धत: नारळाचे तेल (साधारण दोन वाटी)घ्या ते गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये चार ते पाच जास्वंदाची फुले घाला गॅस बंद करातर तेल थंड झाल्यावर गाळून  बाटलीमध्ये भराया तेलाने केस धुण्यापूर्वी तीन ते चार तास केसाच्या मुलांना मसाज करा. नंतर शाम्पू ने केस धुवा .

[वरील पद्धती पैकी दुसरी पद्धत जास्त सोपी सहज आहे. एकदा तेल तयार करून ठेवल्या तुम्ही त्याचा हवा तेव्हा वापर करू शकता.]

4. तिळाचे तेल

 तिळाच्या तेलामध्ये झिंक हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो की जो केसांच्या वाढीसाठी अतिशय लाभदायक असतो. तिळाचे तेल कोमट करून केसाच्या मुळाना नियमित मालिश केल्याने केस गळणे कमी होते.

 

5.कढीपत्ता

खोबरेल तेल गरम करून त्यामध्ये कढीपत्त्याची पाने घाला थंड झाल्यावर ते तेल गाळून बाटलीत भराकेस धुण्यापूर्वी चार ते पाच तास या कढीपत्त्याच्या तेलाने मालिश करा. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्यास नक्कीच उपयोग होईल.

6.   कोरफड (एलोवेरा जेल)

कोरफडीच्या पानांमधील गर काढून केसांना लावल्यास, नवीन केस उगवण्यास मदत होते. कोरफड उपलब्ध नसेल तर आज-काल बाजारात तयार एलोवेरा जेल सहजपणे मिळते त्याचा वापर ही करू शकता.

       

7.अंड

 मध्ये प्रोटीन बायोतीन आणि विटामिन बी भरपूर प्रमाणात असते.  ज्यामुळे केस गळणे कमी होण्यास मदत होते.  याचा वापर करण्यासाठी अंड्यामधील पांढरा भाग काढून घ्या त्याच्यामध्ये थोडे ऑइल मिक्स करा  आणि हे मिश्रण केसाच्या मुळाना लावा. अर्ध्या तासानंतर शाम्पू ने केस धुवा. याचा वापर आठवड्यातून किमान  दोन वेळा केल्यास नक्कीच फरक जाणवेल. 

8. कांदा   

 कांद्याचा रस केस गळणे कमी करतो आणि केसांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त आहे.  कांदा सोलून कट करून तो मिक्सरला फिरवून त्याचा रस काढून घ्या.  हा रस केसाच्या मुळांनाना लावा.  साधारण अर्ध्या तासाने सुकल्यानंतर कोमट पाण्याने शाम्पूने केस धुवा. नक्कीच  याचा आठवड्यातून दोनदा वापर केल्याने फरक  जाणवेल.

वर नमूद केलेले आठ घरगुती उपाय आहेत. बाजारातील विविध महागडे प्रोडक्ट्स वापरून केसाला अजूनच वाईट परिणाम भोगावे लागण्याची शक्यता असते. काहीजण महागडे महागडेहेअर ट्रीटमेंट ही घेतात. त्याऐवजी हे घरगुती उपाय  करणे जास्त चांगले आहे. शिवाय हे घरगुती उपाय केल्याने तुमचे केस चांगले तर होतीलच आणि त्याचा कुठलाही दुष्परिणाम तुम्हाला भोगावा लागणार नाहीहे उपाय बाह्य उपचार आहेतजर तुम्ही तुमची जीवनशैली बदलली आहार उत्तम ठेवला आणि नियमित व्यायाम केला तर केस गळणे नक्कीच कमी होईल.

You may also like:

 Ayurvedic Beauty Tips

 

Post a Comment

Previous Post Next Post