Ayurvedic beauty tips in Marathi #आयुर्वेदिक ब्युटी टिप्स इन मराठी
आजकाल सगळ्यांनाच सुंदर दिसायचे
असते. आपला चेहरा आपण सुंदर दिसावे गोरे दिसावे असे सर्वांनाच वाटते. पण फक्त गोरे
असून उपयोग नाही तर चेहरा तजेलदार असणे ही महत्त्वाचे आहे.आज-काल महिला असू
देत का पुरुष सगळेजण स्वतःला सुंदर ठेवण्यासाठी भरपूर प्रयत्न करतात
आज आपण आपली त्वचा आपला चेहरा गोरा राहण्यासाठी काही घरगुती उपाय पाहणार आहोत. हे आयुर्वेदिक ब्युटी टिप्स नियमितपणे केले तर आपल्याला फरक दिसून येईल तुमच्या त्वचेचा रंग उजळेल आणि त्वचा तजेलदार बनेल
1.
मध -
एक चमचा दूध पावडर दोन चमचे मध आणि अर्ध्या लिंबाचा रस या सर्वांना नीट मिक्स करून घ्या आणि चेहऱ्यावर लेप लावा. लेफ्ट सुकला की थंड पाण्याने चेहरा धुवा. रोज हा उपाय केल्यास तुम्हाला फरक जाणवेल
2.
टोमॅटो
सर्वांच्या किचनमध्ये मिळणारा अतिशय सोपा उपाय. टोमॅटोचा रस चेहऱ्यावर लावा सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.
हा अतिशय स्वस्त आणि सोपा उपाय आहे.
3.
गुलाब पाणी
अर्धा चमचा लिंबाच्या रसामध्ये चार पाच थेंब गुलाब पाणी टाका चेहरा आणि गळ्याला लावा सुकल्यानंतर धुवा.
4.
तांदळाचे पीठ
एका वाटीमध्ये एक चमचा तांदळाचे पीठ घ्या त्यामध्ये दूध आणि मध घालून पेस्ट तयार करा. चेहऱ्याला लेप लावा व सुकल्यानंतर धुवा.
5.
कच्चे दूध
उन्हामुळे काळवंडलेली त्वचा असेल तर कच्चे दूध घेऊन त्याने मालिश करा सुकल्यानंतर थंड पाण्याने धुवा,
हा उपाय नियमित केल्यास त्वचा उजळण्यास मदत होईल.
6. एका वाटीमध्ये लिंबाचा रस घ्या त्यामध्ये अर्धा कप दूध घ्या आणि चार-पाच थेंब ग्लिसरीन टाकून मिक्स करा . हे मिश्रण चेहऱ्याला हाताला मानेला झोपण्यापूर्वी लावा.
रोज रात्री याचा वापर केला तर त्वचा उजळेल टवटवीत होईल आणि पिंपल्स पासून मुक्ती मिळेल.
7. दही आणि बेसन
दही आणि बेसन यांची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावा.
चुकल्यानंतर धुवून टाका.
यामुळे चेहरा उजळेल आणि त्वचा टाईट राहील.
या मिश्रणाच्या वापर करून आंघोळ केल्यास ही फायदा मिळेल.
8. एक चमचा लिंबाचा रस त्यामध्ये कच्चे दूध आणि थोडा काकडीचा रस मिक्स करा, हे मिश्रण चेहऱ्यास लावून सुकल्यानंतर थंड पाण्याने धुवा.
9. बटाटा
बटाट्यामधील स्टार्च मुळे त्वचेचा काळेपणा कमी होतो. कच्चा बटाटा किसून त्याचा रस काढा.
रस्सा मध्ये कापूस बुडवून तो चेहऱ्यावर,
मानेवर लावा. सुकेपर्यंत ठेवून थंड पाण्याने धुवा. नियमित वापराने नक्कीच फरक जाणवेल.
10.बेकिंग सोडा
बेकिंग सोडा आणि पाणी याची पेस्ट तयार करून घ्यावी ही पेस्ट चेहऱ्याला लावून दहा मिनिटे ठेवावी दहा मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा मसाज करून धुवावा. त्यामुळे चेहरा गोरा होण्यास मदत होते
11. मसूर डाळीचे पीठ
मसूर डाळीचे पीठ घेऊन त्यामध्ये दूधआणि मध घालून पेस्ट तयार करावी हे मिश्रण चेहऱ्याला व्यवस्थित लावावे. सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा.साबणा ऐवजी रोज अंघोळीसाठी हेच मिश्रण वापरल्यासही त्वचा उजळण्यास नक्की मदत होईल
12. कोरफडीचा गर ( एलोवेरा जेल)
बाजारातआज-काल एलोवेरा जेल बाजारात मिळते. सुकल्यानंतर धुवून टाकावे अथवा रोज रात्री
झोपण्यापूर्वी चेहऱ्यास लावावे.
13.कच्च्याअंड्याचा पांढरा भाग
अंड्यातील पांढरा भाग चेहरा लावावा. पंधरा मिनिटांनी सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. त्वचा उजळण्याबरोबरच काळे डाग जाण्यासाठी मदतहोते
14.पपईचा गर
पपईचा गर चेहऱ्यावर चोळावा सुकल्यानंतर थंड पाण्याने धुवा .यामुळे त्वचा उजळते व चेहऱ्यावर तेज येते
15. हळद
पी हळद आणि हो गोरी. हे काही चुकीचे नाही. कच्चा दुधामध्ये हळद घालून त्याचा लेप चेहऱ्यास लावा. सुकल्यानंतर थंड पाण्याने धुवा. काही दिवसातच त्वचा उजळल्याचे आपणास दिसून येईल
16. दही
त्वचा उजळण्यासाठी दही खूप महत्त्वाचे काम करते. दह्यामधील लॅक्टिक ऍसिड हे एक नैसर्गिक ब्लीच आहे. एक चमचा दही घेऊन चेहऱ्यावरती मसाज करा व सुकल्यानंतर कोमट पाण्याने धुवा. नियमित उपायाने नक्कीच फरक जाणवेल.
17. केळं
पूर्ण पिकलेलं अर्ध केळ घ्या आणि गरजेप्रमाणे दूध घालून मिक्स करा त्याची चांगली पेस्ट तयार करा ही पेस्ट चेहऱ्याला लावा पंधरा मिनिटांनी सुकल्यानंतर धुवून टाका. हा उपाय कितीतरी वर्षापासून प्रचलित आहे आहे.
या सर्व साध्या सोप्या आणि स्वस्त उपायाने तुम्ही तुमची त्वचा टवटवीत नितळ आणि गोरी ठेवू शकता.
या सर्व हे आयुर्वेदिक ब्युटी टिप्स नियमितपणे केले तर आपल्याला फरक दिसून येईल आणि बरोबरच आपण आपला आहार व्यवस्थित ठेवला तर त्वचा निरोगी दिसते व टवटवीत राहते. आहारामध्ये भरपूर भाज्या पालेभाज्या यांचा समावेश असावा.अजून एक महत्त्वाचे म्हणजे पाणी भरपूर प्यावे ज्यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते. तसेच आपल्या आजूबाजूला मिळणारी ऋतू नुसार उपलब्ध असलेली फळे खावीत त्यामुळे हीत्वचा उजळते. त्याचबरोबर बाहेरील अन्य अन्नपदार्थ बेकरीतील पदार्थ टाळावेत. नियमित व्यायाम करावा ज्यामुळे त्वचा निरोगी व नितळ राहण्यास मदत होते.