माझी शाळा यावर निबंध

 

 माझी शाळा यावर निबंध















माझी शाळा दहा ओळीत मराठी निबंध 
Set 1 for 1st ,2nd ,3rd ,  Standard

 

  1. माझ्या शाळेचे नाव शांतिनिकेतन विद्यालय आहे.
  2. माझ्या शाळेची इमारत सुंदर आणि प्रशस्त आहे .
  3. शाळेच्या मागील बाजूस मोठे पटांगण आहे तेथे रोज सकाळी आम्ही एकत्र जमतो आणि प्रार्थना म्हणतो 
  4. माझ्या शाळेत  तीस  वर्गखोल्या आहेत.वर्गाच्या भिंती विविध रंगांनी आणि विविध भौमितिक आकृत्यांनी सुशोभित केल्याआहेत
  5. माझ्या शाळेत एक प्रयोगशाळा देखील आहेतेथे आम्हाला विविध प्रयोग शिकविले जातात.
  6.  शाळेमध्ये एक ग्रंथालय ही आहे.  
  7. आम्हा विद्यार्थ्यांना तेथे विविध पुस्तके वाचावयास मिळतात.
  8. शाळेभोवती विविध मोठी झाडे आहेत. तेथे आम्ही आमचे डबे खातो.
  9. माझ्या शाळेतील सर्व शिक्षक प्रेमळ आणि काळजी घेणारे आहेत.
  10.  मला माझी शाळा खूप आवडते मला माझ्या शाळेचा अभिमान आहे


माझी शाळा मराठी निबंध [शंभर- दीडशे  शब्दात]     
Set 2 for 4th,5th   Standard

 माझ्या शाळेचे नाव नूतन  विद्यालय आहेमाझी शाळा मोठी आहे. माझ्या शाळेची इमारत अतिशय प्रशस्त सुंदर आणि मोठी आहे. माझ्या शाळेची इमारत तीन मजली आहेप्रत्येक मजल्यावर आठ वर्ग आहेतसगळे वर्ग सुप्रकाशित आणि हवेशीर आहेत. वर्गाच्या भिंती वेगवेगळ्या डिझाइन्स ने सुशोभित केल्या आहेत.

शाळेमध्ये एक प्रयोगशाळा ही आहे, तिथे विद्यार्थ्यांना विविध प्रयोगदाखविले जातात.माझ्या शाळेत एक प्रशस्त  ग्रंथालय आहेतिथे हिंदी इंग्लिश मराठी भाषेतील विविध पुस्तके आहेत तसेच वर्तमानपत्रे आणि शिक्षण विषयक माहिती पुस्तिका देखील आहेत .माझ्या शाळेत संगणक प्रयोगशाळा ही आहेतेथे आम्ही संगणक शिकतोशाळेच्या मागे मोठे खेळाचे मैदान आहेतेथे रोज सकाळी आम्ही एकत्र जमतो प्रार्थना करतो सर्व महत्त्वाचे कार्यक्रम समारंभ  होतात

शाळेमध्ये सहा शिपाई आहेत ते  सगळे वर्ग, पायऱ्या, वरांडा स्वच्छ ठेवतात. तसेच मुलांची काळजी घेतात. शाळेत आलेल्या  पाहुण्यांशी ,पालकांशी आदराने वागतात

 माझ्या शाळेमध्ये 35 शिक्षक शिक्षिका आहेतश्रीकाळे हे आमचे हेडमास्टर आहेत माझ्या शाळेतील सर्व शिक्षक प्रेमळ पण कडक शिस्तीचे आहेत

मला माझी शाळा खूप आवडते आणि मला माझ्या शाळेचा अतिशय अभिमान आहे.


 माझी शाळा मराठी निबंध [अडीचशे  शब्दांमध्येनिबंध]

Set 3 for 5th,6th   Standard

शाळा ही अशी जागा आहे जिथे लोक शिकतातप्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शाळेचे खूप महत्त्वाचे स्थान असते प्रत्येक लहान मुलाच्या आयुष्यात शाळा ही खूप मोठी भूमिका बजावते कारण शाळेत जाण्यापूर्वी तेमुर घरातल्या छोट्याशा जगात असते त्याचा बाहेरील जगाशी परिचय नसतो शाळेमुळे मुलाचा पहिल्यांदा बाहेरील मोठ्या जगाशी परिचय होतो म्हणूनच प्रत्येक लहान मुलाच्या जीवनात शाळा महत्त्वाची असते

 असे म्हटले जाते की शाळा आपल्याला अधिक जबाबदार नागरिक बनवण्यासाठी जबाबदार असते चांगला विद्यार्थी की चांगल्या शाळेची निर्मिती असते त्यामुळे आपण शाळांना आदराने वागवले पाहिजे

माझी शाळा माझ्या घराजवळच आहे . शाळेत चालत जाण्यास दहा मिनिटे लागतात माझे बरेचसे मित्र लांबून शाळेत येतात काहींना बसणे अथवा रिक्षाने यावे लागते तर काहींना त्यांचे पालक ज्ञान करतात

माझी शाळा अतिशय शिस्तप्रिय आहे जेव्हा शाळेची पहिली  घंटा होते तेव्हा सर्व मुले फाटकाच्या आत आलेली असावीत आणि दुसरी घंटा होते तेव्हा सर्व मुले आपापल्या वर्गात गेली पाहिजेत मग तिसरी घंटा होते तेव्हा प्रार्थना सुरू झाली पाहिजे असा आमच्या शाळेचा नियम आहे

 शाळा आम्हाला आमच्या वर्ग मित्रांना सहकार्य करायला शिकवते.शेअरिंग करणे हे शाळेमध्ये पहिल्यापासूनच शिकवले जाते आपल्या वर्ग मित्रांशी सहपाठ्यांशी मित्रत्वाने प्रेमाने कसे वागायचे हे आमचे शिक्षक सतत शिकवत असतात.त्यामुळे आमच्या शाळेतील विद्यार्थी चांगले घडतातआमचे सर्व शिक्षक मनमिळाऊ आहेत तसेच ते आम्हाला विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यास प्रवृत्त करतात. आमच्या शाळेत विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा भरवल्या जातात त्याचे प्रशिक्षण सुद्धा शाळेत चालते. अभ्यास आणि सह अभ्यास क्रम या दोन्ही गोष्टींना समान महत्त्व दिले जाते जेणेकरून  विद्यार्थी अधिक चांगल्या व्यक्तीमध्ये विकसित होऊ शकू. आमची शाळा नेहमी आमच्या सर्वांगीण  विकासाकडे लक्ष  देतअसते. त्याशिवाय उन्हाळी सुट्टीत आमच्यासाठी पोहण्याची, चित्रकलेची तसेच विविध कलांची खास शिबिरे आयोजित केली जातात. आमच्यासाठी लहान मोठ्या सहली काढल्या जातात. अशाप्रकारे आमची शाळा नेहमी आमच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देते आणि आमच्या मध्ये चांगला नागरिक घडवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आमची शाळा  आमच्या शहरातसुप्रसिद्ध आहे.

     

माझी शाळां मराठी मध्ये निबंध [300-450]

Set 4 for High School Students

मला माझी शाळा अतिशय आवडते शाळा ही आपले भविष्य सुखकर अधिक चांगले बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका  बजावते. शाळेचे महत्त्व हे कोणीही नाकारू शकत नाही शाळा अशी गोष्ट आहे तिची सामान्य आपला विशेष बनवते विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण गुणांना वाव देण्यामध्ये शाळेची भूमिका महत्त्वपूर्ण असते .

शाळा म्हणजे विद्यालय शब्दाचा अर्थ विद्येचा आलय आलय म्हणजे घर. शाळा म्हणजे विद्यालय ही एक अशी जागा आहे जेथे विद्येचे उपार्जन होते आपल्या संस्कृतीमध्ये विद्येला देवीचे स्थान दिले आहे आणि विद्यालय म्हणजे शाळेला मंदिराची उपमा दिली आहे

छत्रपती शिवाजी महाराज असे माझ्या शाळेचे नाव आहे. माझ्या शाळेमध्ये पहिली ते बारावी पर्यंत वर्ग आहेत.शाळेच्या  भोवतीनेउंच भिंतीचे कुंपण आहे. माझ्या शाळेची इमारत प्रशस्त आणि सुंदर आहे शाळेच्या फाटकावर एक सुरक्षारक्षक असतो. कोणत्याही अज्ञात व्यक्तींना परवानगीशिवाय आत सोडले जात नाही.

माझी शाळा शहराच्या  रहदारीपासूनथोडी दूर आहे त्यामुळे तिथे अतिशय शांतता आहे. शाळेच्या भोवती छान हिरवीगार झाडे आहेत ज्यामुळे तेथील वातावरण शुद्ध राहण्यास मदत होते या झाडाखाली आम्ही सर्व विद्यार्थी दुपारी जेवणाचा आनंद घेतो. यामुळे विद्यार्थ्यांना झाडाचे पर्यायाने पर्यावरणाचे महत्त्व समजून येते

  शाळेच्या समोर मोठे खेळाचे मैदान आहे जिथे आम्ही सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी खेळतो तसेच शारीरिक व्यायामही करता येतात. त्याच बरोबर त्या पटांगणावर योगा क्लासही चालतोयाच पटांगणावर रोज सकाळची असेंबली वरती. तसेच वार्षिक स्नेहसंमेलन आणि इतर कार्यक्रम सुद्धा येथेच  भरवले जातात.   शाळेची इमारत तीन मजली आहे. प्रत्येक मजल्यावर दहा वर्ग आहेत. शाळेतील शिक्षकांसाठी विशेष रूम आहे. एक रूम हे शिक्षकांसाठी आहे. शाळेमध्ये भव्य ग्रंथालय ही आहे. या ग्रंथालयाचा सर्व विद्यार्थ्यांना त्याचबरोबर शिक्षकांना भरपूर फायदा होतो. दुसऱ्या मजल्यावर एक प्रयोगशाळा आहे जिथे विद्यार्थ्यांना विविध प्रयोगाचे प्रात्यक्षिके दाखविली जातात. प्रयोगातून शिक्षण हे आमच्या  शाळेचे वैशिष्ट्य आहे. याचबरोबर एक संगणक कक्ष ही आहे. तिथे विद्यार्थ्यांसाठी 30 संगणक आणि शिक्षकांसाठी दहा संगणक आहेत. सर्व विद्यार्थ्यांना संगणकाचा पुरेपूर फायदा होतो. सर्व विद्यार्थ्यांना संगणक हाताळता येतो आणि त्यामुळे विद्यार्थी संगणकाचा आत्मविश्वासाने वापर करू शकतात

 माझ्या शाळेत 1000 विद्यार्थी तीस शिक्षक एक प्राचार्य आणि सहा शिपाई आहेतसर्व शिपाई शाळेच्या  साफसफाईची काळजी घेतातत्यामुळे आमचे शाळा नेहमीच स्वच्छ आणि नीटनेटके असते आमच्या शाळेतले वातावरण प्रसन्न आणि शिस्तप्रिय आहे.

शालेय अभ्यासाव्यतिरिक्त  विविध क्रीडा कला यांचेही मार्गदर्शन आमच्या शाळेमध्ये होते. आमचे सर्व शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी  प्रवृत्त करतात.उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आमच्या शाळेत विविध प्रकारची शिबिरे भरवली जातात जसे की चित्रकला नृत्य कला संगीत पेंटिंग हस्तकला टाकाऊतून टिकाऊ वादविवाद स्पर्धा अशा एक ना अनेक प्रकारचे शिबिरे आयोजित होतात. या शिबिरांमध्ये केवळ आमच्याच शाळेचे विद्यार्थी सहभागी होता सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येते.

माझ्या शाळेतील सर्व शिक्षक अतिशय कष्टाळू आणि  मनमिळावू आहेत. सर्व शिक्षक आपापल्या विषयात पारंगत आहेत विद्यार्थ्यांना समजून घेऊन शिकवतात. आमचे सर्व शिक्षक प्रेमळ असले तरी ती शिस्तप्रिय आहेत त्यामुळे आमच्या शाळेमध्ये शिस्त नियम अतिशय कडकरीत्या पाळले जातात पण त्या  शिस्तीमुळेच शाळा शाळेचे विद्यार्थी नावाजले जातात. या सर्व कारणांमुळे आमची शाळा शहरामध्ये सुप्रसिद्ध आहे. आमच्या शाळेतून चांगले नागरिक घडवण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे आमची शाळा मला अतिशय आवडते 

 

Post a Comment

Previous Post Next Post