माझी आई यावर निबंध; मराठी निबंध
माझी आई यावर दहा ओळी निबंध
इयत्ता पहिली दुसरी साठी /
1.
माझ्या आईचे नाव सीता आहे
2.
माझी आई खूप प्रेमळ आहे.
3.
माझी आई सकाळी चार वाजता उठते.
4.
माझी आई खूप छान स्वयंपाक बनवते.
5.
ती शिक्षिका आहे.
6.
ती नेहमी आनंदी असते.
7.
ती माझा नियमितपणे अभ्यास घेते.
8.
ती माझी व घरातील सगळ्यांची काळजी घेते .
9.
ती मला छान छान गोष्टी सांगते
10.
माझी आई मला खूप खूप आवडते
माझी आई
[१०० शब्दात निबंध]
[इयत्ता तिसरी चौथीसाठी]
माझी आई मला खूप आवडते माझी आई खूप प्रेमळ आहे. ती रोज सकाळी मला
शाळेची तयारी करावयास मदत करते. ती माझा नेहमी अभ्यासही घेते. रोज घर स्वच्छ करून
नीटनेटके ठेवते. घरातील सर्वांची काळजी घेते. रोज चांगले चांगले स्वादिष्ट पदार्थ
करते. घरातील कोणी आजारी पडले तर रात्रंदिवस ती काळजी घेते. ती माझ्या सर्व
सुखदुःखामध्ये मला सोबत असते आणि ती माझी मैत्रीण आहे. ती मला नेहमी समजून घेते
आणि संकटांना तोंड देण्यास शिकवते.ती आजूबाजूच्या चांगल्या वाईट गोष्टी बद्दल
जाणीव करून देते. वेळोवेळी शाबासकी देते आणि गरज असेल तर ओरडते की सुद्धा. माझी आई
ही माझी पहिली गुरु आहे. अशी माझी आई मला खूप आवडते.
माझी आई [दीडशे
ते दोनशे शब्दात निबंध ]
[इयत्ता पाचवी सहावी साठी]
माझी आई जगातील खूप छान चांगली आई आहे ती माझ्यावर खूप प्रेम करते ती नेहमी कामात असते. ती घरासाठी खूप कष्ट घेते सर्व घर स्वच्छ व नीटनेटके ठेवते. स्वयंपाक घर सुद्धा साफ ठेवते. ती चविष्ट जेवण बनवते. बाजारातून ताजा भाजीपाला आणते वेळोवेळी किराणा सामानही आणते. अत्यंत हुशारीने घर चालवते आणि बचतही करते.
माझी आई मला अभ्यासात नियमितपणे मदत करते मीही तिला गरज असेल तर घर कामात मदत करते. ती मला चांगल्या गोष्टी शिकवत असते. तसेच मला प्रेरणादायक आणि तात्पर्य पूर्ण गोष्टीही सांगत असते. त्यामुळे मला चांगला माणूस बनण्यास मदत होते.
माझी आई मला प्रेमाने सोनू म्हणते. ती माझी व घरातील सगळ्यांचीच अतिशय काळजी घेते. ती आमच्या घरातील एक महत्त्वपूर्ण व्यक्ती आहे.ती नेहमीच आमच्या सुखासाठी धडपडत असते. घरातील कोणाला बरे नसेल तर दवाखान्यात नेते व पूर्ण काळजी घेते.
माझी आई अतिशय प्रेमळ आणि मदत करणारी आहे. ती शेजाऱ्यांची ही वेळोवेळी मदत करते. ती अतिशय कष्टाळू आहे तरीही ती नेहमी हसतमुख आणि प्रसन्न असते. त्यामुळे मला माझ्या आईचा अतिशय अभिमान आहे आणि मी नेहमी तिला त्रास होणार नाही याची काळजी घेईन.
माझी आई [300 शब्दात निबंध]/ माझी आई मराठी निबंध 300 शब्द
{हायस्कूल साठी}
माझी आई [300 शब्दात निबंध]
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी हे स्वामी विवेकानंदांचे वाक्य अगदी खरेच आहे. आई हा एक अनमोल शब्द आहे. मायेने डोक्यावरून हात फिरवणारी आई नसेल तर जीवन व्यर्थ वाटते आईच अशीच असते की कोणत्याही संकटात आपल्याला एकटे पडू देत नाही त्यामुळे जीवनामध्ये आईचे महत्व कोणीही टाळू शकत नाही कोणतेही मूल बोलायला शिकते तेव्हा पहिल्यांदा आई हाच शब्द बोलते.
आई असा शब्द आहे ज्याच्या विषयी जितके बोलेल तेवढे कमीच आहे.
आपण आईच्या शिवाय ही कल्पनाही करू शकत नाही. आई आपल्याला जन्म देते त्यामुळे
जगामध्ये सर्व जीवनदायी वस्तूंना आई अशीच उपमा दिली जाते. आईला प्रेम
आणि करुणा यांचे प्रतीक मानले जाते. आई सगळे कष्ट सहन करते आणि आपल्या
पाल्याला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करते.आई आपल्या स्वतः पेक्षाही आपल्या मुलावर
जास्त प्रेम करते ती स्वतः उपाशी राहील पण मुलांना खाऊ घालायला कधीही विसरत किंवा
कंटाळा करत नाही.
माझी आई माझी खूप चांगली मैत्रीण आणि माझी प्रिय व्यक्ती आहे. तसे बघायला गेले तर माझे आई आणि बाबा दोघेही माझ्यावर खूप प्रेम करतात. पण माझी आई अशी व्यक्ती आहे की तिच्याबरोबर मी सगळ्या गोष्टी शेअर करू शकते माझ्या मनातल्या सर्व गोष्टी मी तिच्यापुढे मांडू शकते. माझी आई शाळेमध्ये शिक्षिकाही आहे पण तरीही ती घरातल्या सगळ्यांसाठी वेळ देते आणि काळजी घेते. आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यातील जे काही चढ-उतार आले त्या सगळ्यांमध्ये मला माझ्या आईने साथ दिली. त्यामुळे माझी आई माझ्यासाठी एकखूप मोठा आधार स्तंभआहे. तिने मला आयुष्यातल्या प्रत्येक वळणावरती मार्गदर्शन केले. मला वाटते माझी आई एक वास्तव जगातील देवी आहे की जी अचानकपणे आलेल्या कोणत्याही संकटांना सामोरे जाते आणि संकटांवर मात करते.
माझी आई माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे. ती स्पष्ट वक्ती, आणि विनम्र आहे. ती आम्हा सर्वांसाठी निस्वार्थी प्रेम, प्रबळ इच्छाशक्ती , अथक परिश्रम आणि प्रेमळपणा याचे चांगले मूर्तींमंतउदाहरण आहे.मला माझ्या आईने कशाप्रकारे आपले उद्देश साध्य करावयाचे, आपली जीवनशैली निरोगी कशी ठेवायची, कोणत्याही संकटांना, आव्हानांना कसे हाताळायचे हे चांगले शिकवले आहे.
माझ्या आयुष्यातील यश हे शक्य झाले ते केवळ माझ्या आईच्या मार्गदर्शनामुळे. तिने माझ्या शिक्षणाचा मूलभूतपाया घडवला आणि माझ्यातील सर्व कला कौशल्य विकसित केली. त्यामुळे मी तिच्या या सर्व ऋणांचा सदैव ऋणी राहीन.